बुद्ध सम्राट अशोकांना मानणारे आम्ही षंढ नाहीत – पँथर डॉ. राजन माकणीकर

30

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.13जानेवारी):- अट्रोसिटी कायदा हा कनिष्ठ जातीच्या संरक्षणासाठी असून यात काही बदल करून कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे, या ठाकरेशाही व त्यांच्या घटक पक्षांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

संविधानाने कायद्याच्या माध्यमातून जातितुन कनिष्ठ मानणाऱ्या वर्गाला अट्रोसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे, त्यात काहीश्या सुधारणा राज्य सरकार करत असून या धोरणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चा स्पस्ट विरोध आहे प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले केला जातो मात्र आता पोलीस निरीक्षक ही तपास करतील असा बदल करण्यात येत आहे, हे कटकारस्थान थांबवले नाही तर राज्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.

सरकारच्या वतीने केले जाणारे बदल हे कुचकामी ठरले जाणार असून अट्रोसिटी कायद्याची चौकट हे सरकार मोडू पाहत आहे, प्रसंगी या सरकारला पँथर स्टाईल दणका देण्याची हिम्मत रिपाई डेमोक्रॅटिक राखून ठेवते आहे, बुद्ध, सम्राट अशोकांना मांननारे आम्ही संयमी आहोत पण षंढ नाहीत हे सरकारने समजून घ्यावे. असा इशाराही पँथर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव पँथर माकणीकर यांनी दिला.