विनायक विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्य ऑनलाईन प्रश्नमंजुषाचे आयोजन

31

✒️अमरावती प्रतिनिधी(प्रदिप रघुते)मो:-9049587193

अमरावती(दि.13जानेवारी):-प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे विद्यार्थ्यांकरिता १२ जानेवारी २०२२ राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांकरीता ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या ऑनलाइन प्रश्नमुंजूषे चे आयोजन महाविदयालयात कार्यान्वित असलेल्या ” राष्ट्रीय वारसा संरक्षण समिती ” (National Heritage Protection cell) द्वारे करण्यात आले. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.

त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांनी आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले. अश्या या दोन्ही महान व्यक्तिमत्वाने संपूर्ण जगासमोर हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवले आहे. तसेच त्यांनी केलेले कार्य या देशासाठी खूप मोलाचे आहे. असे आपण सर्वासाठी असणारे प्रेरणाश्रोत विध्यार्थ्यांना समजावे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्दिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या महापुरुषांचे विचार आणि त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी भावी जीवनाकडे वाटचाल करावी असे मत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे यांनी व्यक्त केले.

तसेच या प्रश्नमंजूषा ला महाविद्यालयाच्या IQAC समन्वयक डॉ. सुचिता खोडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रश्नमंजूषा मध्ये महाविद्यालयाती ११३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. ही प्रश्नमंजुषा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डॉ. प्रीती देशमुख, डॉ. योगेश गवळी आणि डॉ. विनोद शेरेकर यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले. या प्रश्नमंजुषेमध्ये कु. राणी शाह वाणिज्य स्नातक भाग ३ , सार्थक राऊत विज्ञान स्नातक भाग ३, कु.स्नेहल कावरे विज्ञान स्नातक भाग २ यांनी प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकाविला.