विडूळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेची स्थापना

53

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.13जानेवारी):-येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने स्वबळावर लढणार असून त्याच अनुषंगाने गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता या अभियाना अंतर्गत उमरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या विडूळ येथे दिनांक 7 तारखेला वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाच्या ग्राम शाखेची स्थापना करण्यात आली.

येथील स्थानिक बुध्द विहार येथे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव डी के दामोदर,नगरसेवक संबोधी गायकवाड, समता सैनिक दल चे मार्शल विनोद बेर्डे ,तालुका प्रमुख संतोष जोगदंड, रत्नदीप धूळध्वज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली, सदर बैठकीत युवकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

यावेळी विडूळ ग्राम शाखा प्रमुख पदी रवींद्र हापसे, उपाध्यक्ष पदी कृतिक धुळे, संदीप ठोके, महासचिव पदी नितीन कानिंदे,
प स प्रमुख पदी निखिल धुळे तर शैलेश काळबांडे, संजय धुळे, प्रेम धुळे, निर्भय धुळे, इस्माईल बेग, प्रदीप पाईकराव, विशाल नगारे,राम धुळे, यांना विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली, या वेळी शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश घेतला.