वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शुभम मंडपे यांची नियुक्ती

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14जानेवारी):-फुले ,शाहू, आंबेडकरी चळवळीचे युवा नेते व समता सैनिक दलाचे सैनिक तथा वंचित प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष व आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य मा.शुभम गोवर्धनजी मंडपे यांची वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांनी शुभम मंडपे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन व श्रद्धेय बाळासाहेब उर्फ ऍड .प्रकाश आंबेडकर यांच्या प्रति निष्ठा बाळगून नियुक्ती करण्यात आली आहे