सितागुडा येथील दाल मिल चक्की सुरू करा सुदामभाऊ राठोड यांची मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.15जानेवारी);-सितागुडा येथील मानव विकास अंतर्गत मिळालेली दाल मिल चक्की 3 वर्षापासून धूळखात आहे, २०२० पासून सीतागुडा येथील आदिवासी कोलाम बांधवांच्या उपयोगासाठी दाल मिल चक्की बसवून देण्यात आली होती तेव्हापासून ती दाल मिल चक्की आतापर्यंत आदिम कोलाम बांधवांच्या उपयोगात तीन वर्षांमध्ये एकही दिवस त्या मशीनचा उपयोग घेता आलेले नाही, अशी माहिती सुदामभाऊ राठोड यांना माहिती होताच सितागुडा येथे जाऊन चौकशी केले असता ही बाब उघडकीस आली.

यावेळी उपस्थित विशाल राठोड चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (वि.रा.आ.स.) व गावातील जिजामाता बचत गटाच्या सदस्य लक्ष्मीबाई सुभाष आत्राम,सुभाष भिमु आत्राम,आनंदराव आत्राम, रामू सिडाम,भगवंत सिडाम,मोकिंदराव मडावी व गावातील नागरिक उपस्थित होते, मानव विकास अंतर्गत संबंधित अधिकारी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून दाल मिल चक्की सात दिवसात चालू करण्यात यावी, अन्यथा जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED