बैलाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करत मृत वळूवर नगरपंचायत व पत्रकार अविनाश कदम यांनी केले माणसाप्रमाणे अंत्यसंस्कार

29

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.16जानेवारी):-कोरोना महामारीच्या संकट काळात माणसांचे अंत्यविधीही झाले नाहीत तर रक्ताच्या नात्यांनीही मृतदेह घेण्यास टाळाटाळ केली.मात्र,बैलाची कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांना आयुष्यभराची साथ देणाऱ्या बैलाचा शेवट माणसांप्रमाणे आष्टी नगरपंचायत व पत्रकार अविनाश कदम यांनी आष्टी शहरात सोडलेल्या वळूवर अंत्यसंस्कार करुन अनोखी कृतज्ञता व्यक्त केलीय.आष्टी शहरात गेल्या दहा बारा वर्षांपासून सोडलेल्या नंद्या नावाचा वळू शहरात वास्तव्यास होता तो मागील २ ते ३ दिवसांपासून आष्टी शहरातील औदुंबर नगर परिसरात अचानक आजारी पडलेल्या अवस्थेत होता.

आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम व संतोष कदम,ओंकार कदम यांचे प्राण्यांवर असलेले प्रेम यावेळी पाहायला मिळाले त्यांनी स्वखर्चाने मेडिसिन आणून वळूचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले,डॉ.संतोष शामधिरे,डाॅ.संतोष धोंडे हे २ दिवसांपासून उपचार करत होते.अखेर रविवार दि.१६ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता या नंद्या नावाच्या वळूचे निधन झाले या मृत नंद्यावर पत्रकार अविनाश कदम,नगरपंचायतचे अभियंता आजिनाथ गिते,लिपीक शिवकुमार तांबे,दिलीप निकाळजे,शहादेव पायाळ,लक्ष्मण वाल्हेकर,खंडू वाल्हेकर,संतोष कदम,ओकार कदम,काकासाहेब आजबे,हरि धोंडे उपस्थित होते.तर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून माणसाप्रमाणे प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करुन माणुसकीचे दर्शन घडवले.