कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे कंटेनर पोलिसांनी पकडले

30

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:;9075913114

बीड(दि.16जानेवारी):-परराज्यामध्ये बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारा कंटेनर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीडमध्ये पकडला आहे. बीडच्या नेकनूर परिसरातून जनावरे घेत, कंटेनर क्र.केए- 51 एएफ- 9009 यामध्ये तामिळनाडूला बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जात असताना, बीड- अंबाजोगाई मार्गवरील मस्साजोग परिसरात हा कंटेनर पकडण्यात आला आहे.

यामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणारे तब्बल 35 बैल आढळून आले आहेत. तर या जनावरांसह कंटेनर असा 39 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईने जनावरांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी वाहनामध्ये जनावरे कोंबून ठेवण्यात आली होती. एक कंटेनर नेकनूर परिसरात आणुन उभे करण्यात आले आहे. यात 35 जनांवरे होती. यावेळी कंटेनर क्र.केए- 51 एएफ- 9009 चा चालकही देखील पकडण्यात आला आहे.