गुंफा यात्रा महोत्सवामुळे तपोभूमी परीसरात भक्तिमय वातावरण

38

🔸सकाळच्या प्रहरी ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, रामधून, श्रमदान

🔹दुपारी महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील)

नेरी(दि.16जानेवारी):-६२ व्या गुंफा यात्रा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज (ता १५)ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान,रामधून व श्रमदानानंतर पार पडलेल्या महीलांनी सहभाग घेतलेल्या राष्ट्रसंतांच्या भजनाने पावन तपोभूमीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.तपोभुमीत कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम केले जात आहेत.वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेल्या गुंफा यात्रा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज सर्व प्रथम ग्रामस्वचता करण्यात आली.त्यानंतर शालीकराव वाढई यांच्या मार्गदर्शनात सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी दामोदर दडमल यांनी रामधुन च्या महत्वावर आपले विचार मांडले.

सकाळी नव वाजता श्रमदान करण्यात आले.दुपारी एक वाजता महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.महीला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ममताताई डुकरे,जि.प सदस्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ लताताई पिसे, सभापती पं.स चिमूर,गिताताई कारमेंगे, वनिता गजभे, इतर महीला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रत्नमालाबाई सोनुले यांनी केले.कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले असून प्रत्येक गुरुदेव भक्तांनी मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवून सहभाग घेतला होता हे विशेष.