तपोभुमीतील विकास कामे पूर्ण कधी होणार ?

  39

  🔹६२ वा गुंफा यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने गुरुदेव भक्ताच्या मनांतील इच्छा

  🔸लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय ?

  ✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

  नेरी(दि.16जानेवारी):-वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली चिमूर तालुक्यातील गोंदेडा हे गाव गोंदेडा गुंफा तसेच तपोभूमी श्रीक्षेत्र या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते.विदर्भाची पंढरी म्हणून तपोभूमीच्या यात्रा महोत्सवाची ओळख आहे.संपूर्ण ग्रामीण विकासाचा कायापालट करण्याची क्षमता ज्या गितेत आहे ती ग्रामगीता इथेच स्फुरली आणि इथेच उगम पावली.याचं तपोभुमीतील अर्धवट विकास कामे पूर्ण कधी होणार? असा प्रश्न गुरुदेव भक्त करीत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून ही तपोभूमी विकासासाठी आसुसलेली होती.

  तपोभुमीत येणाऱ्या भाविकांसाठी ५००लक्ष रुपयांचे भक्त निवास बांधकाम सुरू झाले परंतु दोन-तिन वर्षांपासून अर्धवट बांधकाम झाले आहे आणि आता बांधकाम बंद आहे तरी बांधकाम पूर्ण करुन भक्ताना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गुरुदेव भक्त करीत आहेत.तपोभूमीकडे येण्यासाठी विहिरगाव कडून तसेच खांबाडा येथुन येनारे दोन्ही मुख्य मार्ग आहेत मात्र हे दोन्ही मार्ग अत्यंत वाईट अवस्थेत असुन सर्वच लोकप्रतिनिधी याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष करीत असल्याने तपोभूमीकडे येणाऱ्या गुरुदेवभक्ताची या रस्त्यानीं जणू वाटबंदीच करुन ठेवलेली आहे.अनेक कामे श्रमदानातून पूर्ण करनाऱ्या राष्ट्रसंताच्या तपोभूमीत मात्र शासनाचा इतका पैसा ओतूनही हे भवन इतक्या वर्षानंतरही पुर्णत्वास आलेली नाही ? हि उध्वस्त अर्धवट खंडर ईमारत म्हणजे तपोभूमीच्या देखण्या भागाला कुरुपता आनत असल्याच्या भावना अनेक गुरुदेव भक्तानी बोलुन दाखवल्या..