शालेय विद्यार्थ्यांचे झिरो ब्यलेन्स वर बँकेत बचत खाते काढण्यात यावे

31

🔸अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ची मागणी

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.17जानेवारी):-नुकतीच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी यांनी कलेक्टर साहेब कडे निवेदन द्वारा विद्यार्थ्यांचे बँके खाते झिरो व्यालंस वर काढण्याची मागणी केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी करिता विविध शिष्यवृत्ती योजना आहेत त्याकरिता त्यांना बँके खाते असणे बंधनकारक आहे अश्या सूचना आहेत .त्यामुळे शिस्यवूत्ती पात्र विद्यार्थ्यांना खाते काढणे अनिवार्य झाले.कोरोणा मुळे ग्रामीण भागातील पालकाची आर्थिक स्थिती बेताची झालेले आहे.

अश्या परिस्थिती मधे बँके खाते करण्याची जिकिरीचे झलेलेल आहे. त्याचप्रमाने ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने कागदपत्रे गोळा करण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे शाळकरी विद्यार्थाचे खाते झिरो ब्यालंस वर काढण्याकरिता आदरणीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यात आले. जेणेकरुन वेळेत खाते उघडण्यात येईल व विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. हलाखीची ग्रामीण अर्थव्यवस्था व विद्यार्थी हित जोपासण्याकरीता संघटनेने पाऊल उचलले आहे.या प्रसंगी समाजकल्याण सभापती दयाराम काळे उपस्थित होते त्याचप्रमाणे अखिल संघाचे सरचिटणीस किरण पाटील , प्रवीण खरबडे, सतीश वानखडे, सुरज मंडे प्रफुल्ल ढोरे, भूषण ठाकूर, आदी उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.