आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाकरिता निधी उपलब्ध !

🔹वरुड मोर्शी तालुक्यातील २ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.17जानेवारी):-व वरुड तालुक्यातील भूजल पातळी ही सर्वेक्षण यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार कमी असल्याने त्यामध्ये वाढ करण्यासाठी करावयाच्या उपाय योजने संदर्भात मृद व जलसंधारण मंत्री दत्ता भरणे व आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली होती.

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी व वरुड तालुक्यातील विविध क्षेत्रात जलसंधारण उपाययोजना करून सिंचन क्षेत्र वाढविण्यासंदर्भात मृद व जलसंधारणाच्या कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्यामुळे मृद व जलसंधारण मंत्री दत्ता भरणे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेत मोर्शी वरूड मतदारसंघातील भूजल पातळी वाढविण्या करिता उपाययोजना करण्या संदर्भात वरुड मोर्शी तालुक्यातील पाळा २ येथील को.प. बंधारा दुरुस्ती करणे करिता १८.७१ लक्ष रुपये, खेड २ येथील को.प. बंधारा दुरुस्ती करणे १६.८४ लक्ष रुपये, उदखेड येथील को.प. बंधारा दुरुस्ती करणे १५.७१ लक्ष रुपये, लाडकी येथील को.प. बंधारा दुरुस्ती करणे ३४ ४३ लक्ष रुपये मोरचुंद येथील को.प. बंधारा दुरुस्ती करणे ३४.३० लक्ष रुपये, घोडदेव येथील लघु सिंचन तलाव दुरुस्ती करणे ३३.१६ लक्ष रुपये, पळसोना येथील लघु सिंचन तलाव दुरुस्ती करणे २७.०१ लक्ष रुपये अश्या एकूण जलसंधारणाच्या ७ कामांना १८०.२५ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत जलसंधारण उपचार बांधकामाच्या आवश्यक कामाकरिता १०० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण करण्या करीता मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील को प बंधाऱ्या करीता १५.५ लक्ष रुपये, वरुड तालुक्यामध्ये १०० ते २५० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण करण्या करीता पळसोना येथे लघु सिंचन तलाव निर्माण करण्याकरिता ३८.६६ लक्ष रुपये मंजूर करून या दोन्ही कामांकरिता ५३.७१ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता ५ जानेवारी रोजी प्रदान करण्यात आली आहे.आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन वरुड मोर्शी तालुक्यातील बंधारे व लघु सिंचन तलाव दुरुस्ती, सिंचन तलाव निर्माण करण्याकरिता २ कोटी ३४ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू, यांचे आभार मानले.

आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील पाण्याची पातळी वाढवून वरुड मोर्शी तालुका ड्राय झोन मुक्त करण्यासाठी मतदार संघातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन येथील शेतकरी समृद्ध करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार धडपड करतांना दिसत आहे. वरुड मोर्शी तालुक्यातील खोलवर गेलेली पानी पातळी वाढविण्यासाठी मतदार संघातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले अपूर्ण सिंचन प्रकल्प आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने पूर्णत्वास जात असल्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळला आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED