चामोर्शी- आष्टी परीसरात विजेची स्मस्या

36

✒️भास्कर फरकडे(तालूका प्रतिनिधि,चामोर्शी)मो:-९४०४०७१८८३

चामोर्शी(दि.१७.जानेवारी):- तालुक्यातील आष्टी परीसरात सध्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे आष्टी परीसरातील नागरीकांना विजेच्या समस्याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे विद्युत विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन विज समस्येतून तात्काळ दिलासा ध्यावा, अशी मागणी आष्टी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

चामोर्शी तालुक्यातील काही भाग जंगलाने व्यापलेला आहे बहूतांश गावात जंगलातून विज वाहीन्या टाकण्यांत आल्या आहेत त्यामुळे दररोज वीजपुरवठा खंडीत होत आहे दिवसातून अनेकदा विजपूरवठा खंडीत होतो त्यामूळे आष्टी परीसरातील जनता ऋस्त झाली आहे विजपूरवठा खंडीत झाल्यानंतर अनेक वेळा रात्रो ग्रामस्थांना अंधारात राहवे लागत आहे विजपूरवठा सुरळित ठेवण्या संदर्भात अनेकवेळा विद्युत विभागाचे लक्ष वेधूनही आष्टी परीसरातील विजेची स्मस्या जैसे थेच आहे त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत विद्युत विभागातील अधिकाऱ्यानी नागरीकांना भेडसावनाऱ्या समस्याची गांभिर्याने दखल घेऊन नियमीत विजपूरवठा करण्याची मागणी आष्टी परीसरातील नागरीकांनी केली आहे