प्रा,शिवराज बांगर यांची तात्काळ सुटका करावी अन्यथा बीड जिल्हा प्रशासनाच्या विरोधातआत्मदहनासारखा मार्ग पत्करावा लागेल – विवेक कुचेकर

83

✒️नवनाथ आडे(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.19जानेवारी):-वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे माजी बीड जिल्हाध्यक्ष समाजसेवक प्रा, शिवराज बागंर पाटील यांच्यावरती एमपीडीई(महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा)नुसार कारवाई करण्यात आली असुन ही कारवाई चुकीची असुन प्रा,शिवराज बागंर पाटील यांना तात्काळ सोडण्यात यावे अन्यथा बीड जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आत्मदहनासारखा मार्ग पत्करावा लागेल असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा) कुचेकर यांनी दिला आहे

झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई करण्यासारखे कोणतेच गंभीर गुन्हे शिवराज बागंर यांच्यावर दाखल नाहीत पंरतु पालकमंञी धनंजय मुंडे व बीड जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठविणे हा एकमेव गुन्हा प्रा शिवराज बागंर पाटील यांनी वारंवार केलेला आहे त्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरून दुषित हेतुने जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठोबंरे यांना हाताशी धरून पदाचा व अधिकाराचा दुरपयोग करून अधिकारी व सत्ताधारी मंडळी यांनी त्याना स्थानबध्द केले आहे
प्रा, शिवराज बागंर यांच्यावर झालेल्या केसेस या वैयक्तिक किंवा लोकामध्ये दहशत पसरविण्यावरून झालेल्या नाहीत तर सामाजिक लढ्ढयासाठी आणी सर्वसामान्यासाठी केसेस झालेल्या आहेत माञ ही कारवाई जिल्हाप्रशासनाने राजकिय दबावातुन केली असुन सामाजिक चळवळीत सर्व सामान्याच्यां प्रश्नावरती रस्त्यावर उतरून आक्रमक बाजू मांडणारयावर थेट एमपिडीईची कारवाई होत असेल तर उधा सर्व सामान्य जनतेच्या ,ऊसतोड कामगारांसाठी तसेच गोरगरिब जनतेसाठी कोणीही रस्त्यावर उतरून न्याय मागणार नाही.

प्रा,शिवराज बागंर पाटील यांच्यावरती केलेली कारवाई चुकीच्या पध्दतीने असुन त्यांच्या व मानवी जीवनाच्या नैसर्गिक हक्काविरूध्द असुन त्यांच्यावर केलेली कारवाई तात्काळ थांबवून त्यांची सुटका करण्यात यावी अन्यथा बीड जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आत्मदहनासारखा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा) कुचेकर यांनी दिला आहे.