स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळा सुरू करण्याचे अधीकार द्या- सरपंच ॲड.शर्मीलाताई रामटेके

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.17जानेवारी):-शासनाने कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद केल्या.15 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद राहणार आहेत.या शासनाच्या निर्णयाचा नुसता निषेध नाही तर धिक्कार करत नवेगाव पांडव च्या उच्चशिक्षित सरपंच ॲड. शर्मिलाताई रामटेके यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका करत शासनाच्या या निर्णयाचां निवेदनाद्वारे धिक्कार केला.कोरोना बियर बार मध्ये बसून दारू पिणाऱ्याच्या ग्लासात येत नाही का? तो निवडणूक मतदान केंद्रावर येत नाही का? तो आमदार खासदार यांच्या पोरा पोरींच्या लग्नात येत नाही का ? तो लाखोंची गर्दी जमवणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात येत नाही का? कोरोना फक्त शाळेत कसा येतो ? यासारख्या अनेक प्रश्नांची विचारपूस करत निवेदन देण्यात आले.

फुले शाहू आंबेडकर यांनी सिंचित केलेल्या महाराष्ट्रात विद्यार्थ्याचे भविष्य उजेडाकडून आंधराकडे नेण्याचा कट सरकार आखते आहे असाही आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आले.खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यां च्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे.मात्र जिल्हा परिषद शाळेत शिकणारे व खाजगी अनुदानित शाळेत शिकणाऱ्या मुलाचे भविष्य काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात यावेत त्यामुळे सरसकट शाळा बंद होणार नाही. अश्या आशयाचे हे निवेदन होते.

सदर निवेदन सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.हे निवेदन देताना नवेगाव पांडव च्या सरपंच ॲड. शर्मीलाताई रामटेके मॅडम यांच्या सोबत होमराज नवघडे साहेब, शारदाताई नवघडे, सोमेश्वर पांडव,पी.पी.रामटेके मॅडम,विजय नवघडे हे उपस्थित होते.