पंचायत समिती समोरील खड्डा देत आहे अपघाताला निमंत्रण

43

🔹अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष

🔸एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

नांदगाव खंडेश्वर(दि.19जानेवारी):- पंचायत समितीच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर ऐक मोठा खड्डा पडला असून पंचायत समिती मध्ये जाताना हा खड्डा दिसून येत नसल्याने वाहन चालकांना खूप अडचणीचे होत असून येथे अपघाताची शक्यता बळावली असून याकडे येथील पदाधिकाऱ्यांसह अधिकारी वा कर्मचारी यांचे लक्ष असू नये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या पंचायत समिती मध्ये चाललंय तरी काय ? असा प्रश्न तालुक्यातून कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांना पडला आहे.हा खड्डा एकदम दर्शनी भागात असूनही याकडे कुणाचेही लक्ष असू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे हा जीवघेणा खड्डा बुजविण्यात न आल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली असून कोणत्याही क्षणी येथे अपघात होऊ शकतो त्यामुळे हा जीवघेणा खड्डा ताबडतोब बुजविण्याचे मागणी पंचायत समिती मध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांनी गटविकास अधिकारी आणि सभापती यांना केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून हा खड्डा पडला असून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक वाहनांना या खाद्यात जावे लागले असून आपल्या वाहनांचे नुकसान करून घ्यावे लागले आहे पंचायत समिती मध्ये जाताना येताना हा खड्डा सर्वानाच दिसतो परंतु तरीही अद्याप परेंत हा खड्डा का बुजविण्यात आला नाही हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असल्याचे दिसून येते.हा खड्डा रोडच्या मोठ्या नालिवरील पुलावर पडला असून या खाद्यात जर वाहन किव्हाः व्यकती अडकल्यास ते सरळ नालीत पाडून मोडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे !
…………………………………….
स्टेटमेंट
…………………………………….
सदर खड्डा हा जीवघेणा असून ती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीस पडत नाही त्यामुळे अपघात होतात याबाबत मी पंचायत समितीचे बांधकाम अभियंता यांना निर्देश दिले आहेत त्यामुळे हा खड्डा शक्य तितक्या लवकर बुज्विण्याची कार्यवाही करण्यात येईल यावर माझे जातीने लक्ष आहे.
एस.आर.खांनदे
गटविकास अधिकारी,पंचायत समिती,नांदगाव खंडेश्वर
…………………………………….