शिरूरमध्ये आ. सुरेश धस यांचाच बोलबाला !

23

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19जानेवारी):-नगर पंचायत निवडणुकीत भाजप आ.सुरेश धस यांनी वर्चस्व राखले आहे. मुंबई येथून कारभार हाकणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या पक्षाला या निवडणुकीत मतदारांनी जागा दाखवून दिली.भाजपने 17 पैकी 11 जागा ताब्यात घेत बहुमत मिळवले तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या.

शिरूर नगर पंचायतसाठी तब्बल 80 टक्केपेक्षा जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला होतावस्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी सभा घेतली होती. मतमोजणी झाल्यानंतर 17 पैकी 11 जागा आ. सुरेश धस यांच्या ताब्यात राहिल्या. तर शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला 4 जागिविजय मिळाला.