घुग्गुस नगरपरिषदेची मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई, 20 हजारांचा दंड वसूल

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्गुस(दि.20जानेवारी):- नगरपरिषदेने मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली असून 11 ते  18 जानेवारी पर्यंत नागरिकांकडून 20 हजारांचा दंड वसूल केला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाच्या संसर्गाने अचानक उसळी घेतली असून चंद्रपुर जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

अशातच घुग्गुस शहरात सुद्धा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी नगर परिषद तर्फे मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर राखण्या बाबत आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असून आता नगर परिषदेने मास्क न वापरणाऱ्या विरोधात कारवाई ला सुरुवात केली असून 8 दिवसात 20 हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पचारे, संदीप मत्ते आदींनी केली आहे.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED