मांडवा येथील स्मशानभुमी वृक्षप्रेमींनी केली हिरवीगार

53

🔸जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे यांनी मांडवा येथील वृक्षप्रेमीचे केले कौतुक

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.20जानेवारी):- तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायती अंतर्गत स्मशानभूमीत ग्राम परिवर्तन समितीच्या पुढाकाराने लोकसहभागातून नागरिकांनी श्रमदान करून २० जुलै २०२१ रोजी विविध प्रजातीच्या १०४ वृक्षांची लागवड केली होती .

व त्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी कैलास राठोड या वृक्षप्रेमींनी घेतली व ते ही कसल्याही फळाची अपेक्षा न करता सर्व झाडे वाचली पाहिजेत असा त्यांनी चंग बांधला यासाठी त्यांनी प्रत्येक वृक्षाला श्रमदानातून आळे केले .तसेच न चुकता दोन वेळेस वृक्षांना पाणी देतात .

स्मशानभूमीत जेव्हा ही रोपटे लावली होती .तेव्हा ती आठ ते दहा फुटांची होती ती आता दोन दोन फूटांनी वाढली आहेत. निसर्गरम्य मांडवा गावाच हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे .त्यामुळे तेथील स्मशानभूमी ही खडकाळ जमिनीवर आहे .ते वृक्ष खडकाळ जमिनीवर आहेत.परंतु त्यांच्या परिश्रमाने अद्यापपर्यंत हिरवीगार आहेत.

अशी माहिती यवतमाळ जिल्हा परिषदेचे काकडदाती सर्कलचे सदस्य भोलानाथ कांबळे यांना मिळताच त्यांनी स्मशानभूमीला भेट देऊन कैलास राठोड या वृक्षप्रेमीचे कौतुक केले .यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, महादेव डोळस,तुकाराम चव्हाण, सखाराम चव्हाण, रमेश ढोले,दादाराव घुक्से, गजानन आबाळे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे, शेषराव जाधव उपस्थित होते.