डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत ब्ल्यू बेल्सची श्रेया पवार अव्वल

35

✒️नायगाव,तालुका प्रतीनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.21जानेवारी):- बाल वयापासून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक ही स्पर्धा १९८१ पासून ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनद्वारे आयोजित केली जाते. या स्पर्धेतही नायगावच्या ब्ल्यू बेल्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेने आपले वर्चस्व कायम तर राखलेच पण याच शाळेतील विद्यार्थीनी श्रेया पवार ही स्पर्धेच्या पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांत विज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणे, तसेच समस्या सोडवण्याची वृत्ती निर्माण करुन कौशल्ये विकसित करणे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या संवेदनशील बनवणे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तर्कशुद्ध पुढाकार घेण्याचे धाडस निर्माण करणे या उदात धोरणातून या परिक्षा आयोजित केल्या जातात. पण नायगाव येथील ब्ल्यू बेल्स शाळेतील विद्यार्थीही अशा परिक्षांना सामोरे जावून ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे पडत नाही हे सातत्याने दाखवून देत असतात. त्यामुळे ब्ल्यू बेल्स या इंग्रजी माध्यामाच्या शाळेचे नावच उपक्रमशील शाळा म्हणून परिचित झाले आहे.

या स्पर्धेमध्ये ब्ल्यू बेल्स शाळेतील इयत्ता सहावी व नववी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सहावीचे १४ विद्यार्थी तर नववीचे २१ विद्यार्थी असे शाळेचे एकूण ३५ विद्यार्थी पास झाले आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी श्रेया पवार ही पात्र झालेली आहे. इयत्ता सहावीतील विद्यार्थी मृण्मय राजूरकर, अवंती चव्हाण, मनीषा रोडेवाड, ओमकार पवार, आरुषी कुऱ्हाडे, रुद्रा कोरे, रोहन तोटेवाड, धनश्री कुरे, विनायक पांचाळ, सई धुप्पेकर, विराज मोरलवार, अनास शेख, अथर्व देवनेव सोहम कोडगिरे हे विद्यार्थी प्राथमिक गटातून पास झाले असून. इयत्ता आठवीतील निकिता जाधव, स्वप्निल गायकवाड, ऋतुजा ब्रह्मकर, जावेद शेख, कृष्णा प्रजापती, प्रथमेश रामपूरकर, अवेज पठाण, प्रणव कोडगिरे, कृष्णा दमकोंडावार, सुप्रिया वडजे, स्नेहा वनशेट्टे, श्रीकृष्णा तेलंग, अनुज मजगे, प्रतिभा रामपुरे, अभिनव नोरलावार, मोहन शिंदे, शिवप्रसाद पाटील, मीझान शेख, अविनाश ताटे, श्रेया पवार व श्रुती वट्टमवार हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनाच्या परिस्थितीतही ब्लू बेल्स शाळेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहे. यंदाच्या वर्षात इंस्पायर अवार्ड, नवोदय, शिष्यवृत्ती, ओलंपियाड परीक्षेत व कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शन खाली चमक दाखवत असल्या मुळे पालकांत आनंदाचा सुर आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक शेख आवेज सर यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. हरीबाबु सर, मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी मॅडम, सल्लागार साई दीप्ती कोप्पेल्लू, पर्यवेक्षक दत्ता कंदुर्के, गंगाधर कानगुले, विलास सर तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.