सांस्कृतिक सभागृह च्या बोगस कामाच्या चौकशीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला आमरण उपोषणाचा इशारा

✒️राहून कासारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.21जानेवारी):-केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम बोगस होत असल्याने ग्रामस्थांनी हरकत घेऊन तक्रारी आहेत होत असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बोगस कामाची चौकशी करून यंत्रणेतील दोषी व्यक्तींना विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी मागील चार वर्षापासून पाठपुरावा करत असून प्रशासनाने ग्रामस्थांच्या दिनांक 25 जानेवारी अमरण उपोषण करण्याचा निर्णय कौडगांवकरांनी घेतला असून तशा आशयाचे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांना देण्यात आले दिलेल्या तक्रारींमध्ये आम्ही ग्रामस्थ मौजे कोडगाव तालुका केज जिल्हा बीड येथील आमचे पूर्वीचे जुने सांस्कृतिक सभागृह पाडून त्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री खासदार रामदास आठवले साहेब यांनी विशेष निधी मंजूर करून सर्व सोयींनीयुक्त सांस्कृतिक सभागृह आपल्या गावात मिळणार असल्याचे सांगून आमचे पूर्वीचे समाज मंदिर जमीनदोस्त करण्यात आली.

माननीय आठवले साहेब यांच्या निधीतून होणारे सांस्कृतिक सभागृह कामाला सुरुवात झाली परंतु सदर काम नियमबाह्य पद्धतीने अत्यंत निकृष्ट व हीन दर्जाचे होत असल्याने सदर काम थांबून शासनाचा हेतू साध्यतेच्या निर्देशानुसार संबंधित विभागाकडून ठरवून दिलेल्या अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावी करता माननीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग केज ,सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज,माननीय तहसीलदार केज, माननीय उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई आधी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे विनंती निवेदन तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाने संबंधित यंत्रणेस नियम आधीं अंदाज पत्रकाप्रमाणे सांस्कृतिक सभागृहाचे काम करण्याचे आदेश देऊनही संबंधितांनी मिळालेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत अत्यंत निकृष्ट दर्जाचे बोगस काम पुढे नंतर अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले त्यामुळे आमचे हक्काचे पूर्वीचे जुने सांस्कृतिक सभागृह आम्हाला वापरास मिळणे बंद झाले आणि नवीनही ग्रामस्थांच्या उपयोगी पडत नाही सदर सांस्कृतिक सभागृह तात्काळ नियमानुसार अंदाज पत्रकाप्रमाणे पूर्ण करून ग्रामपंचायत कडे हस्तांतरित करण्यात यावी जेणेकरून ग्रामस्थांना त्याचा वापर करता येईल म्हणून वारंवार विनंती निवेदने तक्रारी करूनही सदर सांस्कृतिक सभागृहाचे काम यंत्रणेतील संबंधित अधिकारी कार्यरत एजन्सी निधी लाटण्यासाठी बोगस काम करून भ्रष्टाचार करत असल्याचे उघड होत असूनही सदर प्रकरणी आम्ही ग्रामस्थ सन 2018 पासून तोंडी प्रत्यक्ष भेटून वारंवार विनंती करत आहोत.

जून 2020 मध्ये संबंधित कंत्राटदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस काम तसेच पुढे आल्याने आम्ही ग्रामस्थांनी अंदाजपत्रकाची पळत मिळण्यापासून माहिती अधिकार अर्ज देऊन सदर काम नियमात अंदाज पत्रकाप्रमाणे व्हावे करिता वारंवार तक्रार निवेदने प्रसंगी धरणे आंदोलन करत आलेलो आहोत परंतु निवेदन तक्रारीची दखल अंदाज केलेली पाहावयास मिळत आहे. दिनांक 17- 01 -2022 रोजी मागील सर्व निवेदने तक्रारी झालेला पत्रव्यवहार सर्व संदर्भ देऊन आपल्या कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे परंतु अद्याप पर्यंत आपल्या स्तरावरून कोणतीही कार्यवाही झाल्याचे कळविण्यात आलेले नाही त्यामुळे आम्हा कौडगाव ग्रामस्थांवर सतत चार वर्षे संघर्ष करूनही वारंवार आपल्या कार्यालयाचे उंबरे अजूनही न्याय मिळत नसल्याने नाईलाजास्तव आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तरी या द्वारे आपणास सूचित करण्यात येते की या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही न झाल्यास दिनांक 25 जानेवारी 2022, वार मंगळवार रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसत आहोत अशा आशयाचे तक्रार वजा सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना देण्यात आलेली आहे या तक्रारीवर नवनाथ पौळ, अभिमान गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गायकवाड, रमाकांत गायकवाड, विकास गायकवाड ,व्यंकटी गायकवाड ,भारत गायकवाड, मुरली पौळ, गणपत गायकवाड, पांडुरंग कांबळे ,रमाबाई गायकवाड, मंदाकिनी गायकवाड ,समाधान गायकवाड प्रकाश पौळ, शांताबाई गायकवाड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED