म्हसवड येथील रिद्धी सिद्धी संस्थेच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाद्यक्ष अनिल देसाई यांचा सत्कार

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22जानेवारी):-ता.माण येथील सिद्धी सिद्धी संस्थेच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रिया साठे यांनी प्रास्ताविक मांडले व संस्थेबद्दल माहिती दिली.यावेळी रिद्धी सिद्धी संस्था संचलित उमेद महिला विकास निधी लिमिटेडच्या मॅनेजर सोनाली चव्हाण यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल माहिती सांगितली तसेच उमेद महिला उद्योग समुहाच्या कमवा आणि शिका च्या कॉर्डिनेटर भारती तावरे यांनी कमवा आणि शिका या योजनेबद्दल माहिती दिली.

संस्थेच्या संस्थापिका सौ सुरेखा काळेल मॅडम यांनी संस्थेच्या महिला सक्षमीकरण या विषयाबद्दल संस्था महिलांसाठी काय काम करते महिलांना कशा प्रकारे अवेरनेस करते महिलांना त्यांच्या हक्क व अधिकारावर प्रशिक्षण कशा प्रकारे देते महिलांना फक्त सक्षम करून चालणार नाही तर त्यांना कशाप्रकारे आर्थिक सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये आणता येईल त्याच्याबद्दल अनिल देसाई यांना माहिती दिली आणि आता महिलांना कशाची गरज आहे त्याचीही चर्चा केली
यावेळी बोलताना अनिल देसाई म्हणाले मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपाध्यक्ष म्हणून नव्हे तर ही संस्था आमचीच आहे आणि संस्थेचे अध्यक्ष विजय काळेल आणि कुटुंबाशी कशाप्रकारे जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे सांगितले तुमचा भाऊ म्हणून सर्व महिलांच्या पाठीशी मी आहे महिलांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्या महिलांना आर्थिक पाठबळ देऊ महिलांनी पुढे येऊन स्वतःचा व्यवसाय करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि महिलांनी चूल आणि मूल यातच न अडकता स्वतः सक्षम झाले पाहिजे असे देसाई म्हणाले.

तालुक्यातील सर्व महिलांना व्यावसायासाठी पैसे देऊ तसेच महिलांनी संस्थेला सपोर्ट करावा संस्था देत असलेल्या या संधीचे सोने करून घ्यावे.संस्थेसाठी लागणारे साहित्य देतो, संस्थेला नेहमी पाठबळ असेल.तसेच संस्थेच्या फॅशन डिझायनर शिक्षिका रूपाली चव्हाण, उषा लिंगे व मयुरी भिसे बँकेच्या तसेच संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी व महिलांनी आपापली ओळख देसाई यांना करून दिली यावेळी सिद्धी सिद्धी संस्थे बरोबर काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या