आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वात अंबड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन.

14

*शेतकऱ्यांचा आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद….*

✒️जालना-अतुल उनवणे(जिल्हा प्रतिनिधी)

अंबड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे , आमदार नारायण कुचे व माजी आमदार विलासबापु खरात पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले, शेतकऱ्यांना पिककर्जाबाबत येणाऱ्या अडचणी तसेच पावसाळा सुरु झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्ज वाटप ठप्प आहे, महाविकास आघाडीच्या सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पिक कर्जाचे वाटप सुरु करावे तसेच कर्ज माफी योजनेची अमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी बदनापूर अंबड विधानसभा मतदार संघाच्या वतीने धरणे  आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संदीप खरात,सौरभ कुलकर्णी,रमेश शहाणे,संतोष अन्ना जेधे,बाळासाहेब तायडे,रामनाथ कडूळे,भागवत गांडगे,हरिभाऊ साबळे,बबन वराडे,प्रकाश वायभट,नारायण कोळपे,राम गाडेकर,रुशिन्द्र वाबळे,संदीप गीतखाने,विनोद राठोड,गणेश पाचारे व उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.