क्रिकेट स्पर्धांमधून युवकांना चालना मिळेल – माजी.पं.स. सदस्य प्रभाकर सेलोकर

33

🔹खरकाडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 23जानेवारी):-क्रिकेट सारख्या खेळापासून शरीराचा व्यायाम होतो व आरोग्य सदृढ राहते शिवाय अशा स्पर्धेचे आयोजन होत राहिले तर भविष्यासाठी युवा पिढी प्रेरक होऊन त्यांना भविष्यात चालना मिळेल अशा स्पर्धा योजनांमुळे गावात चांगले खेळाडू निर्माण होतील असे मौलिक विचार तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांनी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.

युवा फाउंडेशन खरकाडा यांच्या वतीने 21 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटक ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या हस्ते करण्यात आले सहउद्घाटक जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर यांनी कोणतेही गालबोट न लागू देता ही स्पर्धा यशस्वीरित्या मंडळानी पार पाडावी असे विचार व्यक्त केले उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.जी.एम. बालपांडे साहेब तालुका काँग्रेस किसान सेलचे नानाजी तुपट माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मातेरे माजी सरपंच रवींद्र ढोरे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर ढोरे पत्रकार विनोद दोनाडकर सरपंच सत्यवान शहारे उपसरपंच ताराचंद पारधी ग्रापंसदस्य प्रफुल ठाकरे. बगमारे. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिरामण मुळे सदस्य मनोज मैंद उत्तम बगमारे माजी ग्रांपं सदस्य तुकाराम ठाकरे शंकर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते