मी हंगामी फवारणी सेवानिवृत्त कर्मचारी

94

कर्मचारी म्हटलं तर अगदी समोर एक वेगळाच मानसन्मान मिळतो त्यातही समाजात एक चांगली इमेज म्हणून ओळखल्या जाते. परंतु हंगामी कर्मचारी म्हटलं तर कुणीही विचारायला तयार नाही, परंतु मी हंगामी कर्मचारी असल्याचा मला गर्व होत आहे कारण आज साठ वर्ष ओलांडली आणि घरी सेवानिवृत्तीचा पत्र अगदी हातात तेही सरकारचा कुठलाच मोबदला न घेता.

कर्मचारी वर्गांची सेवानिवृत्ती म्हटलं तर एक वेगळा आनंद कारण कर्मचारी वर्गांना त्यांच्या सेवानिवृत्तीचा आर्थिक मोबदला मिळत असतो आणि तोच आर्थिक मोबदला हंगामी कर्मचाऱ्यांच्या नशिबी नसतो परंतु तरीही आज मी खुश आहे कारण हा पत्र सांगतो की मी कुठलाही आर्थिक मोबदला न घेता सेवानिवृत्त होत आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतो परंतु हंगामी कर्मचाऱ्यावर कोणत्याच प्रकारचा वर्षाव होत नसतो. हंगामी फवारणी करतानी आले किती कठीण प्रसंग त्यातही केले आम्ही कर्मचारी म्हणून काम, हंगामी फवारणी करीत असतानी न्यावी लागायची स्वतःची खाण्यापिण्याची साधन, रात्र काढावी लागायची सरकारी शाळेत तर कधी ग्रामपंचायत मध्ये पण कधी नाही केला सरकारला आम्ही हंगामी कर्मचाऱ्यांनी कामाचा संकोच कारण मी आणि संबंधित आम्ही पडलो हंगामी कर्मचारी 

आला कठोर कोरोनाचा काळ केला त्यातही आम्ही काम पण नाही मिळाली सरकारची मदत नाही मिळाली वापस यायची साधन कारण मी होतो एक हंगामी कर्मचारी . हंगामी कर्मचार्‍याचा या भारत देशात काहीच महत्त्व नाही का? का बरं आम्हाला हंगामी कर्मचाऱ्यांना महत्व नाही? या देशात हंगामी कर्मचारी असलो तरी आम्ही वयाच्या साठ वर्षापर्यंत कर्मचारी म्हणून काम करीत आलो आणि आज सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला आणि फवारणी कामाच्या दूर झालो. सेवानिवृत्ती चा पत्र हातात आल्याने आज पर्यंत केलेली सर्व कामे आठवायला लागली चंद्रपूर जिल्ह्यातील जंगली भाग आठवायला लागली, पहाडावरील गाव आठवायला लागली आणि त्या गावांमध्ये काढलेली ते दिवस आठवायला लागली, का बरं नाही आठवावी आम्ही ते दिवस कारण मी एक हंगामी फवारणी सेवानिवृत्त कर्मचारी.

✒️ रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986