पगार वेळेवर होत नसल्याने केज उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपसंचालक आरोग्य परिमंडळ लातूर यांना दिले निवेदन

35

🔸निवेदनाद्वारे दिला काम बंद आंदोलनाचा इशारा

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.25जानेवारी):-गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगात सह महाराष्ट्रात कोरणा चं संकट ओढवले आहे आणि जगापेक्षा भयानक पहिली आणि दुसरी लाट भारतात येऊन बरीच जीवित हानी झाली आहे अनेकांचे रोजगार गेले असून छोट्या-मोठ्या उद्योग धंद्याची वाटच लागली आहे लोकांच्या नोकऱ्या जाऊन भारतातील सर्वसामान्य बेरोजगार लोक आणि मध्यमवर्गीय जनता देशोधडीला लागली असून उद्योगधंद्याच्या आणि रोजगाराच्या नव्याने शोधत आहे आणि स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा उभा राहु पाहत आहे.

covid-19 च्या दोन्हीही भयानक लाटेत आरोग्य कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून मनापासून प्रामाणिकपणाने कोविड रुग्णांची सेवा स्वतःचा जीव संकटात टाकून केली असून प्रामाणिक पणाने दिवट्या पार पाडलेल्या आहेत स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता स्वतःचा जीव संकटात टाकून प्रमाणिकपणे काम करणाऱ्या आरोग्य सेविका, अधिपरिचारिका चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रक्त तपासणी व एक्स-रे या सर्व कर्मचाऱ्यांच्या उपजिल्हा रुग्णालयातील पगारही वेळेवर होत नसून केज उपजिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करण्याची वेळ आली असून दिनांक 24 जानेवारी दोन हजार बावीस रोजी रुग्णालयातील परी सेविका अधिपरिचारिका चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी रक्त तपासणी एक्सरे व सर्व कर्मचाऱ्यांनी उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय लातूर यांना उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर मिळावे यासाठी निवेदन दिले आहे.

नाथ जिल्हा रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांची पगार वेळेवर होत नसून कधी वीस तारखे नंतर किंवा पुढल्या महिन्यात केला जातो त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा व मानसिक त्रास होत आहे ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेतून घर कर्ज बांधणे, शैक्षणिक कर्ज, कार लोन घेतले आहे अशा लोकांचे बँक हप्ते वेळेवर जात नाही त्यामुळे त्यांची त्यांची बँकेतील पत कमी होत असून त्यांच्या अतिरिक्त व्याज म्हणून त्यांच्याकडून दंड वसूल करीत आहे व पुन्हा त्यांना कुठल्याही बँका कर्ज पुरवठा करण्यास तयार नाही काही कर्मचाऱ्यांचे पाल्य बाहेर गावी शिकण्यासाठी असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यास विलंब होतो.

त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर होत आहे ज्या उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी आपले काम व आपले योगदान मनोभावे करतात अशा कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असेल तर मला काम बंद करण्याची वेळ येईल या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक व कार्यालयीन कर्मचारी जबाबदार राहतील राहतील अशा आशयाचे उपसंचालक,आरोग्य परिमंडळ आरोग्य सेवा कार्यालय लातूर यांना निवेदन दिले आहे व निवेदनाद्वारे जर आमच्या निवेदनाचा व समस्येचा गांभीर्याने विचार केला नाही तर काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे सदरील निवेदनावर 61 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.