पत्नीने केली विहिरीत पडून आत्महत्या तर पतीने मारली पत्नीच्या जळत्या चितेवर उडी

    46

    ✒️नितीन रामटेके(तालुका प्रतिनिधी)

    गोंडपिपरी(दि-22 जुन) तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एकोनविस वर्षीय गर्भवती नवविवाहितेने तीन महिन्याचा गर्भवती असताना रविवारी संध्याकाळी विहिरीत पडून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली. त्या नवविवाहितेचे नाव रुचिता चिट्टावार असे असून हीचा विवाह चंद्रपूर येथील किशोर खाटीक यांच्याशी 19 मार्च रोजी संपन्न झाला. किशोर चंद्रपुरातील आरटीओ कार्यालयातील वाहनचालक प्रशिक्षण केंद्रात मानधन तत्वावर काम करीत होता.
    यांचे लग्न तीन महिन्या पूर्वीच झाले होते. मात्र त्यांच्यात काही अनबन चालू असावे असा अंदाज काढण्यात येत आहे. यामुळे रविवारी संध्याकाळी पत्नी रुचिता चिट्टावार ही विहिरीत उडी मारून आपला जीव दिला. ही गोष्ट पतीला माहीत होताच त्याचा मनावरचा ताबा हरवला. आज तिच्या देहाचा पोस्ट मॅडम करून अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. मात्र पतीचा मनात हे दुःख दुखवत होत. मृत गर्भवती महिलेवर आज अंत्यसंस्कार आटोपून नातेवाईक परतत असताना पतीने पत्नीचा जळत्या चितेवर उडी घेतली. तेथील काही नातेवाईकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले. तरीही त्याने एका विहिरीमध्ये पडून जीव दिला. ही गोष्ट मानवी मनाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना सोमवारी चार वाजता भंगाराम तळोधी येथे घडली. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांना माहिती कळताच चमुसह घटनास्थळी दाखल झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने अशा पद्धतीने आपला जीव दिल्याने यामागे नेमके कारण काय याचा तपास आता पोलिस करीत आहेत.