आत्मदहन आंदोलन करण्यापूर्वीच गेवराई प्रशासनाला जाग

53

🔹निराधारा व सर्व सामान्य जनतेकडून सुनील ठोसर यांचे आभार…!

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.२९जानेवारी):- तालुक्यातील गोरगरीब, निराधारांचे, प्रश्न काही दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त आत्मदहन आंदोलन करणार होते, परंतु वेगवेगळ्या प्रसिद्धीच्या माध्यमातून आत्मदहन आंदोलन करण्यापूर्वीच गेवराई प्रशासनाला जाग आली आहे. आत्मदहन आंदोलन करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ते उपाय राबवल्याचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी सांगितले.

त्यानंतर २६ जानेवारी रोजी निराधारांना, सोबत घेऊन गेवराई पोलिस स्टेशन मध्ये जाऊन निराधार,विकल,विकलांग,अधिकारी मित्र परिवार आदी संघटनेचे पदाधिकारी सोबत घेत मतदार संघातील चार पोलिस स्टेशन ने जो राजकीय दबावापोटी निराधार सोबत लपंडाव केला याला उत्तर देत स्वतः हजर होत रक्त देऊन राज्यात वेगळा आदर्श देत आम्ही सामान्य माणसाला जीवन प्रत्येक पावलात देतो …..! रक्त देऊन सामान्य जनतेचे जीव वाचवण्यासाठी कायम सोबत राहून वेळ पडल्यास स्वतः जीव गेला तरी चालेल पण एखाद्या सामान्य माणसाचा जीव जाऊ नये हीच अशा आणि अपेक्षा व्यक्त करतो रक्तदान करून त्यांचे जे प्रश्न प्रलंबित होते, यावर सविस्तर चर्चा करून मार्गी लागले.

तालुक्यातील हजारो दिव्यांग, निराधारा, वयोवृध्द, हे त्यांच्या शासकीय मानधन योजनेपासून वंचित आहेत, आणि शिफारशीनुसार जे लाभार्थी शासकीय मानधन योजनेत बसत नाहीत. त्यांना देखील मानधन योजनेचा लाभ मिळत आहे, यामध्ये खरे लाभार्थींना वंचित राहावे लागत आहे. हा भ्रष्टाचार अजून किती दिवस चालणार अशा प्रश्न पडला आहे. हे सर्व जॉब विचारण्यासाठी तहसील कार्यालयात पोहच होताच तहसील प्रशासनाने योग्य ते पावले उचलल्यामुळे याबद्दल निराधार जनतेने रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांचे आभार मानले