‘मतदान जनजागृती अभियानात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण’- तहसिलदार श्री पुरुषोत्तम भुसारी यांचे मत

27

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.1फेब्रुवारी):-प्रविण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित, विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्य रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा विषय ‘मतदार जनजागृती’ असा होता .कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे काटेकोर पालन करून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर चित्र रेखटली होती या चित्रांच्या मध्यमातुन विद्यार्थ्यानी जनमानसात मतदाराना मतदानचे महत्त्व पट्वुन संगितले. तसेच सर्व चित्रांचे आणि काढलेल्या रांगोळी प्रदर्शनी चे दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन नांदगाव खंडेश्वर चे तहसीलदार माननीय श्री पुरुषोत्तम भुसारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी प्रतिक्रिया देताना भुसारी साहेब म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थी हा नवमतदार असून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव असणे फार गरजेचे आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून हीं जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न विनायक विज्ञान महाविद्यालयाने ज्या पद्धतीने केला ते कौतुकास्पद आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलका भिसे आणि डॉ. सुचिता खोड़के IqAC समनवयक उपस्थित होत्या. स्पर्धेला परीक्षक डॉ.श्याम दळवी सहायक प्राध्यापक , शारीरिक शिक्षण विभाग आणि डॉ.दशरथ काळे वाणिज्य विभाग हे होते. उत्कृष्ट अशा दोन रांगोळींना पारितोषिक देण्यात आली. प्रथम क्रमांक कु कल्याणी अंबुलकर बी .कॉम भाग ३ च्या विद्यार्थिनीने पटकावला तिला रोख २०१ रु बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक जयश्री तानकर बी एस्सी.भाग ३ च्या विद्यार्थिनी पटकावला तिला रोख १०१ रु बक्षीस म्हणून देण्यात आले.

चित्रकला स्पर्धेमध्ये १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कु नंदिनी कणसे बी.एस्सी भाग ३ च्या विद्यार्थिनी ला प्रथम पारितोषिक च्या स्वरूपात रोख १०१ रु. देण्यात आले. महिलांचे नावे मतदार यादी मध्ये नोंदविण्यात यावी साठी महिला मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला होता. परंतू नांदगाव खंडेश्वर च्या सर्व महिलांचे मतदार यादी मध्ये नावे नोंदवलेली होती. सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांना, विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी याना कुठल्याही आमेषाला बळी न पडता नियमित मतदान करण्याची शपथ देण्यात आली.