सेवानिवृत्ती निमित्त सैनिक किशन सुर्यवंशी यांचा सत्कार समारंभ

30

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.3फेब्रुवारी):-भारतीय सैन्य दलातील बावीस वर्षांच्या सेवेनंतर ३१ जानेवारी २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेले सैनिक किशन महाजन सुर्यवंशी यांचा शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या जन्मगावी कवाना येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.श्री संत नंदी महाराज संस्थान, कवाना ता. हदगाव जि. नांदेड येथे आयोजित या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अँड. मुरलीधर ढाके हे राहणार असुन विशेष अतिथी म्हणून आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.

हदगाव चे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार जिवराज डापकर, लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड विभागाचे पोलीस उप अधीक्षक धरमसिंह चव्हाण, गट विकास अधिकारी केशव गट्टापोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतापराव सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलुरकर, पोलीस निरिक्षक हनमंतु गायकवाड, मनाठा येथील पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण, साहित्यिक जगदिश कदम, रविचंद्र हडसनकर, वसमत येथील प्रा. श्रीनिवास मस्के, ग्रंथालय संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुबेर धनसिंह राठोड, तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल आदींची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बालाजी शादुलवार हे करणार असुन सामाजिक कार्यकर्ते दिपक सुर्यवंशी हे प्रास्ताविक करणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक व सरपंच संदिप पवार यांनी समस्त गावकऱ्यांच्या वतीने केले आहे.