मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत ताडगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती बाबत प्रशिक्षण देण्यात आले

29

✒️श्रीगोंदा,विशेष प्रतिनिधी(आदेश उबाळे)

श्रीगोंदा(दि.5फेब्रुवारी):- भंडारा जिल्ह्यातील ताडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडगाव येथे आज मॅजिक बस इंडिया फाउंडेशन स्केल प्रकल्प अंतर्गत कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .या उपक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य जबाबदारी व शाळा विकास आराखडा बाबत प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये प्रथमच : सागर उबाळे यांनी स्केल प्रकल्पाविषयी माहिती सांगितली त्यानंतर ऍक्टिव्हिटी थ्रू शाळा व्यवस्थापन समिती चे कार्य जबाबदाऱ्या सांगण्यात आल्यातसेच माहिती देण्यात आली.

त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीला प्रशिक्षण हॉलमध्ये एस एम सी बॅनर चे निरीक्षण करण्यात आले आणि एस एम सी चे कोणते – कोणते अधिकार व कार्य आहेत याविषयी प्रशिक्षण देण्यात आले शाळा विकासासाठी कोणकोणत्या नवीन योजना शाळा , पालक , एस एम सी अंतर्गत कोणते उपक्रम राबवू शकतो याविषयी चर्चा करण्यात आली शाळा विकास आराखडा बाबत चर्चा करण्यात आली यावेळी मॅजिक बस इंडिया स्केल प्रकल्प चे शाळा सहायक अधिकारी सागर उबाळे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तिकापाचे , गावचे सरपंच कांचन हा रगुडे , उपसरपंच -वनिता चौधरी , प्रदीप शेंडे सर , भांगे सर , केवट सर त्याच बरोबर विद्यार्थी , शिक्षकवर्ग , पालकवर्ग सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते