चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथयात्रेला प्रारंभ

26

🔸१४ फेब्रुवारीला रातघोडा यात्रा तर १७ फेब्रुवारीला गोपालकाला

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.5फेब्रुवारी):- नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडायात्रा दिनांक ५ फेब्रुवारीपासुन प्रारंभ झाली असून १४ फेब्रुवारी रोजी रात घोडा रथयात्रा तर १७ फेब्रुवारीला गोपालकाला होणार असून महाशिवरात्रीला यात्रेचे समारोप होणार आहे.

श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूरच्या वतीने आयोजित घोडायात्रे निमित्याने दिनाक ५ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ह. भ. प. विनोदबुवा खोंड महाराज यांचे दररोज रात्री ८.३० वाजता नारदीय कीर्तन होणार आहे. यात्रेचे हे ३९५ वे वर्ष आहे. मागील २ वर्षापासून कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने विविध निर्बंध लावले होते. त्यामुळे यात्रा होऊ शकली नाही. मात्र यावर्षी शासनाचे निर्बंध पाळत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

मिती माघ शुद्ध नवमी १० फेब्रुवारीला गरुड वहन, मिती माघ शुद्ध एकादशी १2 फेब्रुवारीला मारोती वहन व मिती माघ शुद्ध त्रयोदशी १४ फेब्रुवारीला श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेसह घोडा रथयात्रा तर मिती माघ कृष्ण पक्ष १ गुरु प्रतिपदा १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता गोपालकाल्याचे आयोजन केले असून दिनाक १ मार्च महाशिवरात्रीचे विविध कार्यक्रम घेऊन यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

यात्रेत भाविकांनी शासनाचे नियम पाळत सहभागी होण्याचे आवाहन श्रीहरी बालाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॉ. मंगेश भलमे, विश्वस्त अँड. चंद्रकांत भोपे, डॉ. दिपक यावले व नीलम राचलवार यांनी केले आहे.