प्रो राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट येथे लोकशाही पंधरवाडा अंतर्गत “एन.एस.एस. ओरिएंटेशन आणि मतदार जनजागृती” विषयावर आधारित ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

31

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.5फेब्रुवारी):-प्रो राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा- अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधी मध्ये राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र ‘लोकशाही पंधरवडा’ विषयावर आधारित “एन.एस.एस. ओरिएंटेशन आणि मतदार जनजागृती” ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन शनिवार, ५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ ते २.३० दरम्यान झूम मीटिंग व यूट्यूब लाईव्ह द्वारे करण्यात आले.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात यावा आणि त्या दिवसापासुन पुढील १५ दिवस ‘लोकशाही पंधरवडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे निर्देश राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मार्फत महाविद्यालयाला प्राप्त झाले होते. सदर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून राजेश् पटोले, रिसर्च असोसिएटस, स्टेट इलेकशन कमिशन, महाराष्ट्र राज्य, डॉ राजेश बुरांगे, संचालक, रासेयों, संगाबाअवि, अमरावती तसेच् राजेंद्र गवई, सरपंच, दत्तक गाव दहिगाव धावडे तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ विनोद जाधव रासेयो कार्यक्रम अधिकारी व हिंदी विभाग प्रमुख मत्सोधरी कॉलेज, अंबड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सादर वेबिनार द्वारे राजेशजी पटोले सर यांनी उपस्थितींना लोकशाही पंधरवाडा अंतर्गत मतदान विषयी चाटबोट आणि सोशिअल मीडिया द्वारे चालू जनजागृती बाबत माहिती दिली व सर्व युवक वर्गाने यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ विनोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना बाबत माहिती दिली.

आणि ती सर्व माहिती विद्यार्थ्यांनी शांततेत ऐकून घेतली त्याबद्दल आयोजक व सर्वांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व यशस्वी आयोजन रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी रासेयोच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अनुराधा इंगोले तसेच रासेयोचे सह-कार्यक्रम अधिकारी प्रा अतुल डहाने, प्रा. शुभम कदम, प्रा आशुतोष उगवेकर, प्रा गायत्री बहिरे, क्रीडा विभागाचे डॉ एन एस विघे, श्री. निशांत केने व रासेयो स्वयंसेवक यांच्या सहभागातून केले. सदर कार्यक्रमाला शासन निर्देशित सर्व कोविड नियमांचे पालन करीत ऑनलाईन आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला १०० विद्यार्थ्यांनी झूम मीटिंग व २०० हुन जास्त विद्यार्थ्यांनी यूट्यूब लाईव्ह द्वारे सहभाग दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजना करता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली, प्रा प्रविण खांडवे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच संस्थेचे मा. अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, मा. उपाध्यक्ष अॉडव्होकेट. उदयजी देशमुख, मा. कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, मा. सचिव श्री. युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य मा. श्री. शंकरराव काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिनीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे व मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.