राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ शाखा केज तालुक्याची २०२२ नवीन वर्षांची कार्यकारिणी जाहीर

29

🔹नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष रंजीत घाडगे , अनिल वैरागे सचिव , तर नवनाथ पौळ यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.7फेब्रुवारी):- दि.६ रोजी बीड जिल्ह्याच्या शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची जिल्हातील सर्व तालुक्यांची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रामनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष प्राध्यापक दशरथ रोडे तसेच प्रदेश संघटक भागवत वैद्य सर व जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार धिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह बीड या ठिकाणी नवनियुक्त तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली.

पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विजय सूर्यवंशी ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजयकुमार वाव्हळ ,महासचिव विनोद पवार ,परमार प्रवीण ,प्रकाश चितळे ,चंद्रकांत वाळुंज ,अमर राजपूत, महिला प्रदेशाध्यक्ष मनिषा ताई घुले यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठवाडा विभागीयसह सर्व विभागात कार्यकारिणीची सुरुवात झालेली आहे .

सर्व पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर तालुका, शहर ,जिल्हा विभागीय कार्यकारणी जाहीर कराव्यात असे ,आदेश महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय कुमार वाव्हळ यांनी केले आहे.यामध्ये केज तालुक्याची नवनियुक्त कार्यकारणी करण्यात आली . कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या केज तालुकाध्यक्षपदी रंजीत घाडगे यांची तर सचिवपदी अनिल वैरागे व कार्याध्यक्षपदी नवनाथ पौळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सर्व तालक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.