परडगाव येथील अवैध वृक्षतोड थांबवा…

68

🔹गावकरी वर्गाकडून मागणी…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.9फेब्रुवारी):-पर्यावरणाचा समतोल राखाता यावा याकरीता वृक्षरोपण तसेच वृक्षतोड कडेही लक्ष देणे गरजेचे असतांना पारडगाव ग्राम पंचायत हद्दीतील सरपंच बेलगाम, विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करूण पर्यावरणाला तसेच ग्राम पंचायतला उत्पन्नाला तडा जात आहे,

सुंदर वृक्षछाटणी/तोडणीस ग्रामपंचायत सदस्य कमिटीची कुठलिही रितसर परवाणगी घेण्यात आली नाही अशी माहीती सरपंच वगळून इतर सदस्यांकडुन ऐकायला मिळत आहे. तरी याबाबद महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 अंतर्गत वृक्षतोडा वृक्षछाटणी करणायावर नियमानुसार ‘दखलपात्र गुन्हा (F.I.R) मोंदविला जाऊ शकतो त्या अनुषंगाणे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी यांनी विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन उचित कार्यवाही करूण पुढील काळात होणारी अवैध्य वृक्षतोड थांबवावी अशी मागणी परडगाव गावकरी वर्गाकडून करण्यात आली.