गडचिरोली-नितीन रामटेके(गोंडपिपरी)

मो:-8698648634

गडचिरोली(दि23जून) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यात रोजगार प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाच्या * www.mahaswayam.gov.in* या संकेस्थळावर कामगार हवे असलेल्या कंपन्यांना व रोजगार हवा असलेल्या कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोविड -19 मुळे लॉकडाऊन घोषित केलेले असल्यामुळे जिल्ह्यातून बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहेत. परंतु आता कारखाने/ कंपन्या सुरू झाल्यामुळे कामगारांची कमतरता भासत आहे. त्याच प्रमाणे ते कामगार बाहेरगावी नोकरी करीत होते ते स्वगावी परत आले आहेत. त्यामुळे आता काही अटी व शर्तीच्या आधारे सुरू झालेल्या नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10वी, 12वी आयटीआय फिटर, इलेक्ट्रीशियन, पॉलीटेकनिक, तसेच अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए, इत्यादी शैक्षणिक पात्रता पास उमेदवारांनी कौशल्य रोजगार विभागाच्या www. mahaswayam.gov.in पोर्टलवर नोकरिबाबत नोंदणी करावी. नोंदणीकृत उमेदवारांना मुलाखती बाबत तसेच पदभरती बाबत सर्व कार्यवाही संबंधित कंपनी तसेच कार्यालयाच्या सहभागातून होणार आहे. त्यामुळे गरजू लोकांनी त्वरीत जवळच्या ऑनलाईन सेंटर वर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेब साईटवर नोंदणी करावी. तसेच दिनांक. 06,07 व 08 जुलै 2020 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन त्याच संकेत स्थळावर केलेले असल्यामुळे अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे क्रमांकावर 07132-222368 संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रवीण वा. खंडारे यांनी कळविले आहे.

रोजगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED