मतदारांनो तुम्ही लोकप्रतिनिधी बनवता म्हणुन आम्ही निधी देतो खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

92

✒️हानमंत मारोती चंदनकर(विशेष प्रतिनिधी)

नांदेड(दि.16फेब्रुवारी):-गोलेगांववाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह काला,महारुद्र हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा,व कलशारोहन कार्यक्रम भाविक भक्त,गावकरी व पंचक्रोसीतील असंख्य जनसमुदायाच्या साक्षीने नयनरम्यसोहळा मोजे गोलेगाव वाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे पार पडला याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब बोलताना मीही वारकरी सांप्रदायाला जवळुन ओळखतो.

त्यामुळे कसलाही मतभेद न करता भरीव मदत करत असतो कारण मला गल्लीपासुन राजकिय प्रवास करताना अक्षरश:दिल्लीत पाठवलात व माझा ऐतिहासिक विजय विचारपुस करताना नांदेड व मतदार सांगायला विसरलो नाही पुढे बोलताना म्हणाले माझा विजय नसतो तुमचं प्रेम भविष्यात प्रविण पाटील चिखलीकर यांच्या पाठी राहाल यात शंका नाही व या मंदिराला पायाभरणीपासुन ते शेवटपर्यंत मदत म्हणजे उपकार करत खरे तर तुम्हीच विश्वास दाखवुन तुम्हीच माझ्यावर उपकार करता व निधी देण्यासाठी संधी देता आणि मिही कर्तव्य पार पाडतो.

प्रास्ताविक मोजक्याच पण भारदस्त शब्दात मधुकर मुसळे यांनी केले.त्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर साहेबराव काळे सर शरद पवार लोहा तालुकाध्यक्ष भारतिय जनता पार्टी तथा उपनगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास महाराज गिते गट विकास अधिकारी वाव्हळे सर,भाततीय जनता पार्टी युवा तालुकाध्यक्ष बंडु पाटील वडजे ,सरपंच युवा नेतृत्व केरबा केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.