मराठी साहित्य मंच आयोजीत ऑनलाईन काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर .

    57

    बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)
    मराठी साहित्य मंच व साहित्य तारांगण साहित्य समूहात घेण्यात आलेल्या पावसाळी स्पर्धेचा निकाल दी .२२जून सोमवार रोजी लागला , आला पावसाळा या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन १९ जून रोजी करण्यात आले होते त्याचा निकाल काल सोमवार रोजी समूहात अनेक सुप्रसिद्ध साहित्यिकां च्या ऑनलाईन उपस्थितीत जाहीर करण्यात आला .या मध्ये सर्वोत्कृष्ट , परमानंद ए.जेंगठे .जिल्हा चंद्रपूर . उत्कृष्ट , श्रीगणेश शेंडे, भुईंज, सातारा. तर .प्रथम , रामकृष्ण नागरगोजे . बीड, द्वितीय .नंदकुमार सेंदरे.सिरोली,गोंदिया , तृतीय .कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे. वाशिम , उत्तेजनार्थ ..राधिका शहाणे, वंदना हटवार राऊत, अनिता नरेंद्र गुजर, डाॅ.संतोष शिवाजी कांबळे, व प्रज्ञा घोडके हे विजेते ठरले आहेत
    स्पर्धेचे आयोजक , अंगद दराडे यांनी निकाल जाहीर होताच सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. व या स्पर्धेसाठी ओमकार मानकामे सर ,समुह संचालक काव्यरत्न रावसाहेब राशिनकर साहेब(राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित) .यांनी खुप मोठे योगदान दिले .महाराष्ट्रातील एकून 120 पेक्षा अधिक साहित्यिकां नी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता .