राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आष्टी शहर अध्यक्ष पदावर राहुल डांगे

25

🔹आष्टी (पुरोगामी संदेश नेटवर्क)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहर अध्यक्ष पदावर राहूल डांगे यांची नियुक्ती करण्यात आली, ही नियुक्ती माजी मंत्री तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे मार्गदर्शन तथा आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष ऋषीकांत (रिंकू) पापडकर यानी केली. नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आष्टी शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका अध्यक्ष नेमा घोंगरे, सिद्दु जिल्हेकर,विंदेश कान्हेकर,शहबाज शेख, हंसराज दुर्गे आदींनी राहुल डांगे यांचे अभिनंदन केले.