नवीन नवरीसह पाच जणांचा अपघाती मृत्यू

30

🔺उमरखेडकडे येत असतांना भोकर-किनवट रस्त्यावरील सोमठाणा गावाजवळ झाला अपघात

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

नांदेड(दि.21फेब्रुवारी):-जारी कोट ता.धर्माबाद येथून लग्न करून नवीन नवरी घेऊन जाणाऱ्या एका वाहतुक गाडीला सोमठाणा ता.भोकर येथे एका विट वाहणाऱ्या गाडीने समोरासमोर धडक दिल्यामुळे नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.आणि जवळपास 10 लोक जखमी झाले आहेत.सारखी ता.उमरखेड येथील एका कुटूंबातील मुलाचे लग्न जारी कोट ता.धर्माबाद येथील मुलीसोबत झाले.आज सायंकाळी नवीन नवरीला घेऊन गाडी क्रमांक एम.एच.29 ए.आर.3219 मध्ये बसून नवीन नवरदेव सारणी ता. उमरखेडकडे येत असतांना भोकर-किनवट रस्त्यावरील सोमठाणा गावाजवळ विट वाहणारी टेम्पो गाडी क्रमांक एम.एच.04. ए.एल. 9955 ही समोरून आली. आणि थेट नवीन नवरी-नवरदेवाच्या गाडी धडकली.

प्रत्यक्षदर्शी व्यक्ती सांगतात विट गाडीने एका बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला.पण तो यशस्वी झाला नाही आणि समोरून येणाऱ्या नवरी-नवरदेवाच्या गाडीवर ही विट वाहतूक करणारी गाडी जोरदारपणे धडकली आणि अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील आणि त्यांचे अनेक सहकारी पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले.सर्व जखमींना त्वरीत उपचारासाठी भोकर प्राथमिक रुग्णालयात आणले.जखमींपैकी कांही जणांना नांदेडला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या अपघातात मरणाऱ्यांमध्ये नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवार (वय 21) रा.साखरा, नवरीचा भाऊ दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (वय 22), माधव पुरबाजी सोपेवाड (वय 30) रा.जांबगाव ता.उमरी,मैजिक चालक सुनिल दिंगाबर धोटे (वय 28) रा.चालगणी ता.उमरखेड,अज्ञात ईसम असे मयत झाले असून जखमी नावे नागेश साहेबराव कन्नेवार (वय 28) रा.जारीकोट, अविनाश संतोष वंकलवाड रा.तामसा,अभिनंदन मधुकर कसबे (वय 16) रा.वाजेगाव, सुनिता अविनाश तोपलवार (वय 35) रा.तामसा, अनोळखी ईसम असे आहेत.जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखाना नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.