दहा दिवसात दिव्यांगांचे अनुदान वाटप करा, अन्यथा ग्राम पंचायत ताब्यात घेऊ: अभिजित कुडे

28

🔹वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि:-24जुन) उखर्डा केळी येथे दिव्यांगांना ५% उदरनिर्वाह निधी भत्ता दहा दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा ग्राम पंचायत ताब्यात घेऊ असा इशारा राष्ट्रवादी युवक  काँग्रेस  चे  तालुका अध्यक्ष अभिजीत कुडे यांचा नेतृत्वात देताच ग्रामपंचायत प्रशासन हादरले.

उखर्डा येथे दिव्यांगांचा ५% उदरनिर्वाह निधी भत्ता लवकरात लवकर मिळावा, यामागणी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची ग्राम पंचायत वर धडक दिली यावेळी ग्राम पंचायत सरपंच मनाबाई ऊईके व ग्राम सेवक यांनी दिव्यांगांशी चर्चा करून उदरनिर्वाह निधी लवकरच खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोविड १९ या रोगाच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक व्यवसाय बंद झाले आहेत, त्याचा परिणाम अनेक कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे, त्यात दिव्यांग बांधवही शामिल आहेत, दिव्यांग बांधवांचे ही सध्या हाल होत असून अनेक शासनाकडे दिव्यांगांचा असणारा ५ % निर्वाह भत्ता हा दिव्यांंगांंच्या हक्काचा असून बऱ्याच ग्रामपंचायत, यांनी अद्याप तो दिलेला नाही, यामुळे येथील दिव्यांंग बांधवांनी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्वात ग्राम पंचायत वर धडक दिली व सरपंच व ग्राम सेवक यांना निवेदन देऊन चर्चा केली.

ग्राम पंचायत मध्ये११ दिव्यांगांची नोंंदणी असून त्यांंचा हक्काचा ५ % उदरनिर्वाह भत्ता अदयाप दिव्यांगाच्या खात्यां वर वाटप झालेला नाही.तसेच वारंवार सांंगुन सुद्धा ग्राम पंचायत प्रशासनावर कोणती ही दखल घेतलेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे कोवीड च्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेल्या दिव्यांगांना लवकरात लवकर दिव्यांग निधी मिळावा अशी मागणी केली, तर सरपंच व ग्राम सेवक यांनी निधी लवकरात लवकर जमा करणार असे आश्र्वासन दिले. या वेळी रणजित कुडे, रोशन भोयर, मारोती लांडगे, विजय कुडे, तेजस उरकुडे, ऋषिकेश कुडे, विनोद कोठारे, अविनास डोमकावडे, अनिकेत राऊत, आकाश कुडे, प्रफुल उरकुडे, योगेश पुसदेकर, हनुमान नखाते उपस्थित होते. आता निवेदन नाही तर सरळ हल्ला बोल म्हणत येणाऱ्या दहा दिवसात निधी दिव्याग्यांच्या खात्यात जमा न झाल्यास ग्राम पंचायत ताब्यात घेऊ असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी दिला आहे.