चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि:-24 जून)चिमुर परिसरात अव्यद्य दारू विक्री करणारा धंनजय बींगेवार यास आज दुपारी अव्यद्य विदेशी दारू सह अटक करण्यात आली,आरोपी हा एका महत्वपूर्ण राजकिय पक्षा सोबत संबंधित असल्या मुळे चिमुरात खमंग चर्चा सुरू आहे.

खूप दिवसापासून चिमूर परिसरात अवैद्य दारूविक्रेते वेगवेगळी शक्कल लावून स्वतःच्या वाहनाने देशी विदेशी दारू आणून विक्री करीत आहे यावर पोलिसांनी आपली चाणाक्ष बुद्धीचा वापर करून अवैद्य दारू विक्रेता धनंजय बिंगेवार रा. गुरुदेव वार्ड चिमूर याच्यावर पाळत ठेऊन आज रोजी त्याने आपली ग्रे रंगाची सुझुकी मोपेड क्र MH 34 BS 8866 मधील फूट रेस्ट मध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल लपवून पिंपळनेरी मार्गाने येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने चिमूर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्यात 26 नग विदेशी दारूच्या निपा असा एकूण 78,900 रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.
ही कारवाही मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. तारे साहेब , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पोहवा विलास निमगडे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे यांनी पार पाडली.

Breaking News, क्राईम खबर 

©️ALL RIGHT RESERVED