🔸वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि:-24 जुन)महावितरण कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत असून त्यांच्या परिवाराचा विचार करून महावितरण कर्मचारी यांना विमा देऊन सहकार्य करावे . या परिस्थितीत सुद्धा महावितरण कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र लोकांच्या समस्या साठी आपले कार्य करत आहे , सरकारी नी त्यांच्या विचार करून त्यांना विमा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या कडे केली आहे.
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे वातावरण अतिशय चिंतजनक आहे त्या मुळे कर्मचारी वर्ग आपली स्वतःची चिंता न करता आपले कर्तव्य पार पाडत असून सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करून लवकर निर्णय घ्यावा ही विनंती राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा अभिजित कुडे यांनी केली.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED