रक्तदादानाच्या संकल्प पूर्तीने युवकाने केला आदर्श वाढदिवस साजरा

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1मार्च):- मानवाची मदत वृत्ती संपुष्टात येत असल्याचे सर्वत्र बोलल्या जाते, वेळेला महत्त्व देऊन कार्य करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आजही मदत मागणार्‍या हातापेक्षा मद्ती साठी उचलले जाणारे हाथ कमी नाहीत.विदर्भ ब्लड सेवा ग्रुप ब्रम्हपुरी चे अध्यक्ष प्रशांत दादा तलमले यांनी ख्रिस्तानंद रक्तपेढी इथे वाढदिवसा निमित्त आयुष्यातील 8 वां रक्तदान पूर्ण केले.

स्वैच्छिक रक्तदान करून एका निष्पाप जिवाची मालवणारी ज्योत तेजस्वी रहावी यासाठी प्रयत्न केले, आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वाढदिवस आनंदमय झाला. त्या शुभ प्रसंगी उपस्थित कार्याला विदर्भ ब्लड सेवा ग्रुप चे ऑनर युवराज दादा करंडे सक्रिय कार्यकर्ते विशाल गुरूणुले, प्रफुल दादा करंडे मयुर मेश्राम उपस्थित होते, व शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व ख्रिस्तानंद हॉस्पिटल रक्तपेढी मधील सिस्टर आणि कर्मचारी वृंद व विदर्भ ब्लड सेवा ग्रुप ब्रम्हपुरी आणि मित्रपरिवार उपस्थित होते.