अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पीपीई किट चे वाटप करण्यात यावे – सुरेखा अथरगडे

    47

    ?सुरेखा अथरगडे यांनी दिले पालकमंत्री वडेट्टीवार यांना निवेदन

    चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमुर(24 जून):-सध्या च्या परिस्थितीत कोरोना कोविड 19 विषाणू वाढत असून अंगणवाडी कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी शासनाने पीपीई किट द्यावी यासाठी स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य संघटक सुरेखा अथरगडे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे
    भारत देशात कोरोना महामारी आली असून अनेक संकट कोसळले आहे त्यातच महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्णाची वाढती लोकसंख्या पाहता कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढू नये विषाणू पसरू नये यासाठी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस ,व आशा वर्कर यांची मदत शासन घेत असून अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर कडे गावातील संपूर्ण घराघराचा वार्डातील घराघराचा बाहेरून येणाऱ्या लोकांची देखभाल करणे ,अहवाल देणे भेटी देणे, जोखीम ची कामे अंगणवाडी सेविकाकडे सोपविले आहे वरील सर्व कामे करीत असताना अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांना कोरोना लागण होणे नाकारता येत नाही तेव्हा राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कराचा विचार करून तातडीने पीपीई किट शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्वतंत्र अंगणवाडी संघटना राज्य संघटक सुरेखा अथरगडे यांनी राज्याचे मदत व पुनर्वर्सन तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .