राष्ट्रीय सुरक्षा दिवस

27

भारतातील लोक असे समजतात कि सुरक्षा देणे आणि राखणे हे फक्त सरकारचे काम आहे.आपली काहीच जबाबदारी नाही.म्हणूनच आपण कुठे ही कधी कसे ही वागू शकतो. आग,पाणी,आईल,ज्वलंत शील पदार्थ रोडवर पडल्या नंतर होणारे अपघात,वेगावर नियंत्रण न ठेवता चालविणारे वाहन वाहनचालक कधी ही दुसऱ्यांचे नुकसान करतात किंवा स्वता ची जीवितहानी करून घेतात.सुरक्षाचेचे नियमा सर्वानीच पाळले पाहिजे.त्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे सुरक्षा नियमावली आहे,पण ती कागदावरच असते.अपघात झाल्यावर त्याचे महत्व समजते.इमारत बांधकाम,केबल पुलिंग,पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन,मलनिःसारण करणाऱ्या गटारात काम करणाऱ्या कामगारांचा नियमित बळी हा सुरक्षा साहित्य न वापल्यामुळे होतात. त्याची कोणीच जबाबदारी स्वीकारत नाही. असंघटीत कंत्राटी कामगारच गुन्हेगार ठरतात.

देशात दरवर्षी 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस (National Safety Day ) साजरा केला जातोय.याचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे हा आहे. तो खऱ्या अर्थाने नगरा नगरात,सोसायटयात साजरा झाला पाहिजे. मुलामुलींना लहान पणापासून स्वताची सुरक्षा कशी करावी हे माहिती असायला हवे.आपत्कालीन परिस्थितीत आपण कसे वागले पाहिजे आणि काय केले पाहिजे.हे माहिती असणे खूप आवश्यक असते. एखाद्या हॉलमध्ये सभागृहा मध्ये कार्यक्रम सुरु असतांना आग लागली.तर कोणत्या दरवाजाने बाहेर पडायला पाहिजे हे माहिती असणे आवश्यक असते. तसे लिहलेले असते.तरी आपण नेहमी प्रमाणे शॉटकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच गोंधळ होऊन चेंगराचेंगरी होते.सुरक्षा नियम सर्वच ठिकाणी लिहलेले असतात.पण पालन करायचे कि नाही हे प्रत्येकावर अवलबून असते.रेल्वे स्टेशन,बस डेपो मध्ये चढताना उतरतांना जो तीस सेकंद एक मिनिटाचा जिवघेणा खेळ असतो.चढनाऱ्यांनी प्रथम प्रवाशांना उतरू दिले तर गोंधळ बिलकुल होत नाही.पण प्रत्येकाला घाईघाईने जाणे असते.त्यातच नियमांचे पालन होत नाही.मग नि कडून टाकल्या जातो आणि उरतो यम म्हणजेच अपघात…

देशभरात चार मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातोय. सध्या हा दिवस एका सप्ताहाच्या स्वरूपात सर्वत्र साजरा केला जातोय. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना आज देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. पण ते फक्त कामाच्या ठिकाणीच होतात.घरात परिसरात,विभागात होणे सुद्धा आवश्यक आहेत.काम करताना घ्यावयाची काळजी, मोठ्या औद्योगिक ठिकाणी काम करताना टाळावयाच्या गोष्टी, तसेच इतर अनेक दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं लागतं यासाठी सुरक्षा अधिकारी मार्गदर्शन करतात.अपघात कुठे होऊ शकतात.घरात जुना चढताना उतरतांना मोरीत स्नान करतांना बाहेर पडतांना पाणी पडलेले असेल याची कल्पना नसणे.दक्षता आणि सुरक्षा प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे.
देशाच्या सीमेवर लाखो जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेची काळजी घेत असतात. त्यांनाही आजचा दिवस समर्पित केला जातो.राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिल ने देशात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती. या दिवसाची सुरुवात 1972 साली करण्यात आली. भारतात 4 मार्च 1966 साली नॅशनल सेफ्टी काऊन्सिलची स्थापना करण्यात आली होती.त्यामुळेच या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.नॅशनल सेफ्टी काऊन्सिल एक अशासकीय पद्धतीने आणि ना नफा ना तोटा या तत्वावर काम करते. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना एक थीम आयोजित केली जाते.

या वर्षीची थीम ‘सडक सुरक्षा’ (Road Safety) अशी आहे. भारतात रस्त्यावरील दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दरवर्षी हजारो लोक त्याला बळी पडतात. त्यामुळे वाहणे चालवताना वाहतूकीचे आवश्यक नियम पाळणे,काळजी घेणे गरजेचं असतं. त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या वर्षी रोड सेफ्टी या थीमवर भर देण्यात आला आहे.गेल्या वर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस/आठवडा 2021 ची थीम होती ‘आपत्तीपासून शिका आणि सुरक्षित भविष्यासाठी तयार व्हा’ (LEARN FROM DISASTER AND PREPARE FOR A SAFER FUTURE)
राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2022 : राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य व पर्यावरण विकसित करण्यासाठी आणि जनमानसात सुरक्षेसंबंधी जागरूकता आणण्यासाठी 4 मार्च ते 11 मार्च या काळात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोहीम भारतात संपूर्ण देशभर राबवली जाते.भारतात 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी “राष्ट्रीय सुरक्षा परिषद” च्या वतीने हा सप्ताह साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात या सप्ताहाचे महत्व मोठे असते.4 मार्च 1966 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सुरक्षा दिन सुरू केला.हा सुरक्षा सप्ताह आरोग्य संघटना आणि औद्योगिक सदस्यांसह सरकारी आणि गैर-सरकारी संघटना एकत्र येऊन साजरा करत असतात.

दरवर्षी या सप्ताहामध्ये एक घोष वाक्य निश्चित केलेले असते.या सप्ताहामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतर्फे सेमिनार, वादविवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा,सुरक्षा पुरस्कार,बॅनर प्रदर्शने,नाटके आणि गाण्यांचा खेळ,प्रशिक्षण कार्यक्रम,कार्यशाळा,चित्रपट प्रदर्शनांसह विविध सार्वजनिक कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहीमा आयोजित केल्या जातात.अनेक उद्योगात कारखान्यात जी कामे केली जातात,त्या संबंधात सुरक्षेविषयी प्रात्यक्षिके दाखवली जातात. सुरक्षाविषयक कामकाजावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आखले जातात. विविध क्षेत्रातील औद्योगिक कर्मचाऱ्यांना रसायन आणि विद्युत सुरक्षितता, जोखीम हाताळणी, अग्निशामक नियंत्रण,प्रथमोपचाराचे ज्ञान इत्यादीची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीविषयक सखोल माहिती देऊन त्याचे व्यवस्थापन शिकवले जाते.

देशात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची सुरुवात ४ मार्च १९७२ साली करण्यात आली. पासून ४ मार्च या सुरक्षा दिवसाचा प्रारंभ करण्यात आला आणि तेव्हा पासून समाजातल्या सर्व स्तरांवर हे अभियान दरवर्षी राबवण्यात येऊ लागले.या अभियानामुळे औद्योगिक दुर्घटनांच्या दरातही घट झालेली दिसून आली आहे. लोकांना स्वतःच्या सुरक्षे संबंधी चे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी हा या सुरक्षा सप्ताहाचा एकमेव उद्देश्य आहे.सध्याच्या घडीला गेल्या वर्षभरात जगभराने सोसलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या संकटांमुळे औद्योगिक सुरक्षे सोबतच व्यक्तिगत सर्वांगिण स्वच्छता, आपला परिसर आणि समाजाबद्दलची आपली जागरूकता, स्वतःच्या आरोग्याची तसेच आपल्या समाजाच्या आरोग्याविषयीची काळजी या गोष्टींचाही सुरक्षा सप्ताहामध्ये विचार होणे गरजेचे आहे असे मला नव्हे आम्हाला वाटते पाहिजे.या भारताचे आम्ही नागरिक दक्ष, स्व सुरक्षेकडे देऊ आम्ही नेमाने लक्ष.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९