बलात्कार प्रकरणातील आरोपीची चिमूर पोलिसांकडून पाठराखण – अत्याचार पिडीतेचा आरोप

76

🔸चिमूर तालुक्यातील खड्संगी येथील प्रकरण पोहोचले पोलीस अधीक्षक यांचे दरबारात…….

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.5मार्च):–लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार करणा-या आरोपीने शब्द फिरविला आणि दुस-याच मुलीसोबत लग्न केले. दरम्यान, प्रेयसीने चिमूर पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीनंतर प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली नसून पोलीस आरोपीची पाठराखण करीत असल्याचा आरोप अत्याचार पिडीत महिलेने केला आहे. आशिष गजभिये असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव असून तो खडसंगी गावातील रहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की, पिडीतेचा विवाह झाला होता. परंतु पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर ती मुलीसह माहेरी राहत होती. गावातीलच एक युवक तिच्या भावासोबत नेहमी घरी ये-जा करीत होता. यातून पिडीतेची युवकासोबत ओळख झाली. यानंतर आशिषचे नेहमीच पिडीतेच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आशिषने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवुन शारीरिक सबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. परंतु त्याने लग्नास नकार देत दुसयाच मुलीशी लग्न केल्याची माहिती मिळताच पिडीतेने चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पिडीत महिलेने दि. १५ फेब्रुवारीला चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता पोलिसांनी ३७६ (2) कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला. आशिष गजभियेवर गुन्हा दाखल होताच तो फरार झाल्याचे पोलीस सांगत आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो गावात होता. आता आशिष चंद्रपुरात राहत असल्याचे बोलल्या जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीस त्याला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.

गुन्हा दाखल केला असला तरी अजूनपर्यत पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे पिडीतेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे धाव घेतली. अधिक्षक कार्यालयात पिडीतेचा तोंडी बयान घेतला आहे. आशिषने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवुन शारीरिक सबंध प्रस्थापित केल्याचे प्रकरण पोलीस अधीक्षकाचे दरबारात पोहोचल्यामुळे चिमूर पोलीस कोणत्या प्रकारची भुमिका घेतात याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने आरोपी आशिष गजभिये (९८२२७८३१४९) याचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी घरी ठेवुन बाहेर गेला असे त्याच्या घरच्यांनी सांगितले.