वीज बिल समजून घेण्यासाठी शुक्रवारी(26जून)वेबिनार संवादाचे आयोजन

31

🔸 ग्राहकांचे होणार समाधान

🔹वीज ग्राहकांनी सहभागी व्हावे : महावितरणचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.25 जून) लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना विज बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व ग्राहकांच्या वीज बिलविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाद्वारे आपले वीज बिल समजून घ्या या विषयावर ऑनलाईन वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर परिमंडलाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त घरगुती व वाणिजिक ग्राहकांनी सहभाग नोंदवून वीज बिलाविषयी असलेल्या शंकाचे निरासन करून घेण्याचे आवाहन महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे .
शुक्रवार दि. 26 जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत घरगुती व वाणिज्य ग्राहकांसाठी होणाऱ्या वेबिनारमध्ये महावितरणने वितरित केलेले माहे एप्रिल, मे व जून महिन्यातील वीज बिल विषयी असलेला संभ्रम व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे . वेबिनार मध्ये सहभागी होण्याकरिता महावितरणच्या https://meet.google.com/kbh-thhu-avb या लिंकवर जाऊन घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना सहभागी होता येईल. उच्चदाब व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांसाठी वीज बिल संदर्भात समस्या बाबत स्वतंत्रपणे वेबिनरचे आयोजन करण्यात येईल.
ग्राहकांच्या वीज बिलाविषयी समस्याचे निराकरण करण्यासाठी *आपले वीज बिल समजून घ्या * या वेबिनारमध्ये चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे , अधीक्षक अभियंता संजय वैद्य, रविंद्र गाडगे, सर्व कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अभियंते व बिलिंग विभागाशी संबंधित अधिकारीही सहभागी होणार आहे. याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरही ग्राहक स्वतः आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात