?लोकराजा:-छत्रपती शाहू महाराज?

  46

  ?26 जुन-राजश्री शाहू महाराज जयंती(सामाजिक न्याय दिन)निमित्ताने विशेष लेख

  आरक्षण देणारा पहिला राजा
  जे पालक आपल्या मुलांना
  शाळेत घालणार नाहीत त्यांना
  एक रुपया दंड ठोकणारा राजा…..
  अंधश्रद्धा ,कर्मकांड ,दैववाद
  यावर प्रहार करणारा राजा
  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन
  सन्मान करणारा राजा
  सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा
  उमटवणारा राजा
  राजश्री शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
  कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांचे 1883 मध्ये निधन झाल्यावर कोल्हापूरच्या गादीला राजा नव्हता. पुढे त्यांच्या पत्नीने आपल्या सासूच्या संमतीने दत्तक घ्यायचे ठरवले. 22 फेब्रुवारी 1884 ला मुंबई सरकारने दत्तक घेण्यास मान्यता दिली. तेव्हा दहा वर्षाच्या यशवंत घाटगे याला दत्तक म्हणून निवडण्यात आले.
  हा यशवंत घाटगे म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू होय. यांचा जन्म 26 जुलै 1874 रोजी झाला होता. त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे हे कोल्हापूरचे रिजट म्हणून कारभार पाहत होते. यशवंता भावी राजा ठरल्यावर त्याला योग्य शिक्षण देण्यासाठी राजकोट येथील राजकुमार साठी असलेल्या कॉलेजात पाठवले. तेथे यशवंत सर्वांशी मिळून मिसळून वागे. कोणतेही काम करण्यास त्याला कमीपणा वाटत नसे. त्याला शिकार व कुस्ती खूप आवडत असे. बुद्धीने तो तल्लख होता.
  2 एप्रिल 1894 रोजी वयाच्या तिसाव्या वर्षी राज्याचा कारभार शाहू महाराजांच्या हातात आला. तेव्हा महाराजांनी आपल्या नोकराची ची व कारभाराची पाहणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बहुजन समाजातील लोकांना नोकरीतून डावलले होते. उधळपट्टी मुळे संस्थानाच्या तिजोरीत तूट पडली होती. सारी जनता कर्जबाजारी झाली होती. गरिबांच्या जमिनी जमीनदारांच्या ताब्यात गेल्या होत्या. त्याचवेळी “रयतेचा राजा” होण्याचे शाहू महाराजांनी ठरवले.
  1920 साली त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. प्रत्येक खेड्यात शाळा काढून पगारी शिक्षक नेमले. देवळांवर होणारा अवास्तव खर्च त्यांनी शिक्षणाकडे वळवला. माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी राजाराम हायस्कूल व कॉलेज काढले. गरीब विद्यार्थ्यांना नादारी दिली. सर्व जाती जमातींची बोर्डिंग सुरू केली. दलित बांधवांची पिळवणूक थांबावी म्हणून वतने रद्द केली व त्यांना आपल्या खाजगीत नोकऱ्या दिल्या. महाराजांनी 1912 साली सहकारी चळवळीला चालना दिली. कोल्हापूर येथील गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी व्यापार पेढेची स्थापना केली. 1906 मध्ये शाहू मिल चा पाया घातला.
  परदेशात जाऊन आल्यावर त्यांनी धरण बांधायचे ठरवले. लक्ष्मी तलाव बांधून हरी क्रांतीचा पाया घातला. राधानगरी येथे धरण बांधले. शेती, उद्योग, व्यापार व सहकार यांना महत्त्व दिले. समाजातील जातीभेद दूर व्हावेत म्हणून ते खूप धडपडले. त्यांची राहणी अतिशय साधी होती. घोंगडी हे त्यांचे महावस्त्र. खाली टाकले व त्यावर घोंगडी पसरली कि या छत्रपतींचे सिंहासन होई. आयुष्यभर रयतेचा विचार करणाऱ्या ह्या राज्याचा कार्याचा आढावा घेताना यशवंतराव चव्हाण म्हणतात,”शाहू महाराज हे केवळ वारसाहक्काने राजे नव्हते, तर ते लोकांचे राजे होते.”26जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
  “मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे
  माझा माझा ,आजही गौरव गिते गाती
  ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शाहू जी महाराज”.

                                              ✒️सौ.भारती दिनेश तिडके
                                                           रामनगर गोंदिया
                                                            8007664039.