चिंचोली (संगम) फाटा (नांदेड महामार्ग) ते चिंचोली (संगम)

27

🔸ग्रामस्थांच्या 100 ते 150 स्वाक्षरीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सादर

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.11मार्च):-तालुक्यातील चिंचोली (संगम) फाटा (नांदेड महामार्ग) ते चिंचोली (संगम) रास्ता त्वरित करा..!मागील 2 ते 3 वर्षापासून गावाच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली असून अंदाजे 3 किलोमीटर लांबीचा दळणवळणाचा हा मुख्य रस्ता असून ग्रामस्थांचे हाल होत आहे. अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

त्यामुळे जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे धोरण पूर्णपणे उदासीन व दुर्लक्षित दिसून येत आहे.

सदरील चिंचोली (संगम) फाटा (नांदेड महामार्ग) ते चिंचोली (संगम) रास्ता करा! रिपब्लिकन युवा सेनेची मागणीसाठी चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थांच्या 100 ते 150 स्वाक्षरीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना देण्यात आले.

व उमरखेड येथील मा. राठोड साहेब (उपविभागीय अधिकारी), मा.डांगे साहेब (ना.तहसीलदार), मा.माळवे साहेब (ठाणेदार पो.स्टे.उमरखेड) व मा.वानखेडे साहेब (गटविकास अधिकारी) यांच्याशी चर्च्या करून निवेदनाच्या प्रती माहितीस्तव त्यांना देण्यात आल्या.

सदरील मागणी तात्काळ मान्य न झाल्यास रिपब्लिकन युवा सेना व चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थांच्या वतीने येत्या काही दिवसात उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आंदोलन छेडण्यात येईल.

निवेदनकर्ते सुनिल पाटील चिंचोलकर (जिल्हाध्यक्ष यवतमाळ), शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड), गौतमजी नवसागरे (तालुका प्रमुख उमरखेड), भीमराव खंदारे (तालुका उपप्रमुख), संदीप हापसे (संघटक), प्रकाश लोमटे, उत्तम सुर्य, अरुण केंद्रेकर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्तिथ होते.