नाशिक रोड येथे मोबाईल चोरणारा केला गजाआड 2 लाख 14 हजार रुपयांचे 40 मोबाईल व 4 स्मार्टवॉच जप्त

28

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.12मार्च):- रोड येथेकुरियर ची डिलिव्हरी करणाऱ्या महिंद्रा पिकप गाडीतुन धुळे येथे पाठवण्यात ठेवलेल्या मोबाईल वॉच स्मार्ट वॉच असलेली खाकी बॉक्स अज्ञात चोरट्याने आठ दिवसापूर्वी लंपास केले होते या चोरांचा नासिक रोड पोलिसांनी शोध घेऊन त्यांना गजाआड केले आहे चोरट्या कडून 2 लाख 14 हजार 42 मोबाईल स्मार्टवॉच जप्त केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 मार्च रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरील नाशिक पुणे हायवे रोडवर कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्या महिंद्रा पिकपच्या उघड्या दरवाजातून धुळे येथे पाठवण्यासाठी ठेवलेले मोबाईल वॉच स्मार्ट वॉच अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकाने पोलिस अधिकारी व अंमलदार हे मोबाईल चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकातील राजेश साबळे यांना गुप्त बातमी मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपास राजेश साबळे व महिंद्र जाधव हे करीत आहे